आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पूर्वीच्या भांडणातून कोयत्याने मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 8, 2022
Spread the love

मार्केट यार्ड पोलिसांत फिर्याद : बैलबाजार स्वप्नपूर्ती सोसायटीजवळ घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी कोयता, हॉकी स्टीक, लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केट यार्ड येथील बैलबाजार स्वप्नपूर्ती सोसायटीजवळ ६ मार्च २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

अमित सरवदे (वय २६, रा. आंबेडकरनगर, गल्ली क्र.१, मार्केट यार्ड, पुणे) यांनी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीला साथीदाराच्या मदतीने कोयता, लोखंडी सळई, हॉकी स्टीकने मारहाण करून गंभीर जखमी केले. फिर्यादीचे मित्र अरबाज व सनी चौधरी यांनाही हॉकी स्टीक व लोखंडी सळईने मारून जखमी केले. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावर हत्यारे घेऊन धावून जात परिसरात दहशत पसरविली. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सी. डी. भोसले पुढील तपास करीत आहेत.

get_footer();