आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा बाप जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 13, 2022
Spread the love

सिंहगड पोलिसांत फिर्याद : शिक्षिकेच्या नजरेमुळे आला प्रकार उघडकीस

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अभ्यासामध्ये गर्क असणारी मुलगी आता अभ्यास करत नाही. वर्गात कोणाशी बोलत नाही, वर्गात एकदम शांत रहात असल्याचे तिच्या शिक्षिकेला जाणवले. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यातून जन्मदाता पिताच तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार २०१९ ते ८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान वारंवार घडला.

याप्रकरणी मुख्याध्यापिकांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी ४५ वर्षाच्या बापाला अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, पीडित १६ वर्षाची मुलगी धायरीतील एका शाळेत इयत्ता १० वीच्या वर्गात शिकते. ही मुलगी राहते घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन ओठांची पप्पी घेऊन तिच्या वडिलांनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्याला विरोध केल्यावर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला हाताने मारहाण करुन उजवे हाताला दुखापत केली आहे. मुख्याध्यापिकांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने सिंहगड रोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलिसांनी बापाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक खेडकर अधिक तपास करीत आहेत.

get_footer();