आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोटगी घेण्यासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 7, 2022
Spread the love

५५ वर्षाच्या महिलेने दिली फिर्याद : डेक्कन जिमखाना येथील धक्कादायक घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पतीकडे पोटगी घेण्यासाठी आलेल्या ५५ वर्षाच्या महिलेशी अश्लिल वर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपळे सौदागर येथे राहणार्‍या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रभात रोडवर राहणार्‍या तिच्या पतीच्या २६ वर्षाच्या नातेवाईकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि त्यांचे पती हे वेगवेगळे राहतात. फिर्यादी या पोटगी घेण्यासाठी प्रभात रोडवरील पतीच्या बंगल्यात २७ डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता गेल्या होत्या. यावेळी आरोपीने पाठीमागून येऊन फिर्यादी यांना मिठी मारली. तू वेश्या है, अभी मै तुझे तेरी सही जगह दिखाता हु़ अभी तो ये ट्रेलर है, तू रुक मै तुझे अभी पुरी पिक्चर दिखाता हू, किसी दिन मे तेरा रेप करुंगा, असे बोलून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. सहायक पोलीस निरीक्षक पाडोळे तपास करीत आहेत.

get_footer();