आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रसुतीवेळी ओरडल्याने गरोदर महिलेला अमानुष मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 18, 2021
Spread the love

डॉक्टरी पेशाला काळीमा : पुणे जिल्ह्यातील यवतमधील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : डॉक्टरांना खरं तर देव मानले जाते, मात्र काही ठिकाणी डॉक्टर रुग्णांकडून भरपूर पैसे उकळतात. तसेच अनेक वेळा डॉक्टरने रुग्णांना मारहाण केल्याच्या घटनाही घडत असतात. असे काही डॉक्टर वैद्यकीय पेशाला काळीमा फासतात. अशीच एक डॉक्टरांनी रुग्णाला मारहाण केल्याची घटना यवत (ता. दौंड, जि. पुणे) येथे घडली आहे.

प्रसुतीच्या वेळी ओरडल्याने गरोदर महिलेला चापटांनी, बुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली आहे. ही घटना यवत येथील खासगी हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आरोपी डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा गोरख दळवी यांना प्रसूती कळा येत असल्याने त्यांना यवत येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी प्रसुतीच्या कळांमुळे महिला ओरडत असल्याने डॉक्टरने महिलेला शरीरावरील विविध भागावर बुक्क्यांनी, चापटांनी मारहाण केली. यात महिलेच्या चेहऱ्यावरील काही भाग काळा निळा झाला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. डॉक्टरने केलेल्या अमानुष मारहाणीविरोधात महिलेने यवत पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

get_footer();