आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रवाशाला मारहाण करुन गूगल पेवरून पैसे ट्रान्सफर करुन लुटले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 4, 2022
Spread the love

स्वारगेट पोलिसांत गुन्हा : स्वारगेट एस टी स्टँड ते मुकुंदनगर दरम्यान घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : नागरिक आता स्वत:जवळ अधिक पैसे ठेवत नाही. त्याऐवजी ते ऑनलाईन पेमेंट करतात. त्यामुळे रस्त्यात अडवून लोकांना लुटणार्‍या चोरट्यांची अडचण होऊ लागली आहे. त्यावर दोघा चोरट्यांनी चक्क प्रवाशाला मारहाण करुन त्याच्याकडून गूगल पेवर पैसे ट्रान्सफर करुन एका प्रवाशाला लुटले. हा प्रकार स्वारगेट एस टी स्टँड ते मुकुंदनगर दरम्यान घडला.

याप्रकरणी रोहित ईश्वर पवार (वय २७, रा. रायगड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, रोहित पवार हे मुळ गावी जाण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता खासगी गाडीचा स्वारगेट एस टी स्टँडच्या बाहेर शोध घेत होते. इनगेटच्या बाहेर ते थांबले असताना दोघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांनी पवार यांना जबरदस्ती करुन मारहाण केली. त्यांना मोटारसायकलवर बसवून मुकुंदनगर येथील सत्यम – शिवम बंगल्यासमोर आणले. तेथे त्यांच्या मोबाईलवरील गुगल पे अ‍ॅप ओपन करुन पासवर्ड सांगण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्याकडून प्रथम ५ हजार रुपये व नंतर ६० हजार रुपये व शेवटी २ हजार रुपये असे एकूण ६७ हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले. पवार यांना मारहाण करुन मोटारसायकलवरुन पळून गेले. या प्रकाराने फिर्यादी घाबरुन गेले. तसेच त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नसल्याने ते उशिरा पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले. पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

get_footer();