आवृत्ती पुणे
← Back to Homepage

व्यावसायिकाकडे खंडणी मागणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 19, 2021
Spread the love

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : यापूर्वीही उकळली होती पाच लाखांची खंडणी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसर येथील व्यावसायिकाकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास तुम्हाला जड जाईल, अशी धमकी देणार्‍यास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार हडपसर येथील माळवाडी रोडवरील कुमार पिका सोसायटी येथे गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला.

अर्जुन शिरसाठ (वय ४१, रा. दांडेकर पुल, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर परिसरातील हिंगणेआळी येथे राहणार्‍या एका 32 वर्षाच्या व्यावसायिकाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे गांधी चौकात दुकान आहे. त्यांच्या दुकानातील सिगारेट, बडीशेप, बिडी, गोळ्या असा माल चालक टेम्पोतून घेऊन जात होता. पत्रकार म्हणविणार्‍या शिरसाट याने टेम्पो अडविला. टेम्पोची चावी काढून घेतली. हे त्यांच्या टेम्पो चालकाने फिर्यादींना सांगितले. आरोपीने फिर्यादी यांना फोन करुन ”तुम्ही तुमच्या टेम्पोमध्ये सिगारेट, बिडी विकत असता, तुम्ही 5 लाख रुपये द्या. नाही तर तुम्हाला जड जाईल, तुमच्यावर केस करावी लागेल, अशी मागणी केली. सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर अधिक तपास करीत आहेत.

get_footer();