आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शेअर मार्केटमध्ये नफा देण्याच्या आमिषाने 60 लाखाला गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 11, 2022
Spread the love

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : औंधमधील महिलेने दिली तक्रार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ६० लाख ८८ हजार ९३६ रुपयांना गंडा घालणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 5 ऑगस्ट 2021 ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे.

देवीका कुलकर्णी, समर सक्सेना, अनुराग, अमित, देवयानी नारंग यांच्याविरुद्ध चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी औंधमधील 39 वर्षीय व्यक्तीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी फिर्यादी यांना फोन करुन गॅलक्सी ट्रेडर्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. आरोपींनी त्यांच्या कंपनीमध्ये शेअर मार्केटसाठी गुंतवणूक केल्यास 10 टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना गॅलक्सी ट्रेडर्स कंपनीत 60 लाख 88 हजार 936 गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी पैसे गुंतवले. पैसे गुंतवल्यानंतर आरोपींनी ठरल्याप्रमाणे 10 टक्के नफा न देता आणि फिर्यादी यांनी गुंतवलेले पैसे परत न करता फसवणूक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();