आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पीएसआयच्या पत्नी व सासूचा महिलेवर प्राणघातक हल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 28, 2022
Spread the love

हिंजवडी पोलिसांत फिर्याद : दोघींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जागेच्या वादातून पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नी व सासूने राडा घालत एका महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बावधन बु। (पुणे) येथे बुधवारी (दि. २३ मार्च २०२२) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घडला आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून, दोन महिलांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षकाची पत्नी बावधन येथे तिच्या माहेरी आली आहे. तिच्या वडिलांच्या नात्यातील एका कुटुंबासोबत जागेच्या बांधकामावरुन वाद आहेत. याच वादातून फिर्यादी महिलेची सासू आरोपी महिलेच्या घरी गेल्या. आमच्या जागेत बांधकाम करु नका, असे फिर्यादी यांच्या सासूने आरोपी मायलेकींना सांगितले. त्यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण केली. फिर्यादी यांच्या सासूला सोडवण्यासाठी त्यांचे सासरे आणि पती गेले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या सासऱ्यांना ढकलून दिले.

याबाबत फिर्यादी यांचे पती आणि सासू पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले. त्यावेळी फिर्यादी महिला आणि त्यांचे आजारी सासरे घरात असताना आरोपी घरात आले. त्यांनी फिर्यादीला मोठा दगड फेकून मारला. या दगडामुळे फिर्यादी यांचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही त्यांनी हे कृत्य केले. फिर्यादी यांनी दगड चुकवल्यानंतर आरोपींनी त्यांचे केस पकडून गरागरा फिरवले. तसेच त्यांच्या तोंडावर चापटी मारुन बुक्क्यांनी मारहाण केली. माझा नवरा पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) आहे, तुला बघतेच, असे म्हणत आरोपीने धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके करीत आहेत.

get_footer();