आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे विद्यापीठाचे बनावट मार्कलिस्ट तयार करणारी टोळी ‘जेरबंद’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021
Spread the love

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच इतर महाविद्यालयाचे नावाने दिल्या जाणाऱ्या पदवीच्या मार्कलिस्ट तसेच सर्टिफिकेट बनावट तयार करुन त्याची विक्री करणारी टोळी पुणे ग्रामीण पोलीसांचे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे.

गणेश जावळे, मनोज धुमाळ (दोघे रा. निरा, पुणे), वैभव लोणकर (रा. बारामती, पुणे) या तिघांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पुणे विद्यापीठाचे नावाने बनावट मार्कलिस्ट करणारी टोळी नीरा, बारामती परिसरात कार्यरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप येळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने नीरा येथील एका प्रिटिंग प्रेसवर छापा टाकला असता, तेथे पुणे विद्यापीठाचे लेटरहेडवरील बनावट मार्केलिस्ट व सर्टिफिकेट मिळून आले.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे पथकाने ही कारवाई केली.

get_footer();