आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यात गांजाची विक्री करणाऱ्या परप्रांतिय टोळीचा पर्दाफाश

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 9, 2022
Spread the love

गुन्हे शाखा युनिट-1ची कारवाई : 12 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आणि कोंढवा परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या परराज्यातील आरोपींना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-1ने बेड्या ठोकल्या आहेत. पथकाने दोन ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत गांजा, अफीम असा 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सहा जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.7) करण्यात आली.

सिमान शामसुंदर लिमा (वय-60 रा. मु. राजझुक्का गाव पोस्ट गुलबा, थाना ओडबा, जि. गजपती राज्य), अनिलकुमार हरीराम जानी (वय-33 रा. साईनगर, लेन नं. 8 कोंढवा बु. मुळ रा.जि. जलोर राजस्थान), सुनिलकुमार भागीरथराम बिष्णोई (वय-21 मुळ रा. इसरोल, जि. जालोर राजस्थान), कमलेश सदराम बिष्णोई (वय-21 मुळ रा. धोरीमणा जि. बाढमेयर राजस्थान), सुरेशकुमार किसणाराम बिष्णोई (वय-22 मुळ रा. भुत्तेल ता. चितलवणा राजस्थान), मनोहरलाल भगवानाराम बिष्णोई (वय-30 रा. मुळ रा. पनोरीयावा, ता. सेडवा राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करत असताना पुणे रेल्वे स्टेशन येथील आरपीएफ पार्सल चेक पॉईंट गेटसमोरील सार्वजनिक रोडवर एक वयस्कर व्यक्ती आढळून आला. त्याच्याकडे असलेल्या सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये 1 लाख 31 हजार 420 रुपये किमतीचा 6 किलो 621 ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोंढवा येथील कारवाईत 11.71 लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, पथकाला कोंढवा परिसरातील साईनगर मधील रो-हाऊसमध्ये 3-4 जण राहात असून, ते राहत्या घरातून अवैधरित्या अफिम व दोडा चुरा अशा अंमली पदार्थाचा साठा करुन त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रो-हाऊसवर छापा टाकून सुनिलकुमार बिष्णोई व त्याच्या इतर साथिदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 7 लाख 79 हजार 540 रुपये किमतीचा 394 ग्रॅम 770 मिली ग्रॅम वजनाचे अफीम, 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे 22 किलो अफुची बोंडे व दोडा चुरा तसेच 2 हजार रुपये किमतीचे 2 इलेक्ट्रॉनिक काटे, 50 हजार रुपयांचे 5 मोबाईल असा एकूण 11 लाख 71 हजार 540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, संदिप जाधव,
राहुल जोशी, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();