आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यात लग्नाचे बनावट प्रमाणपत्र देऊन तरुणीला 11 लाखांना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 14, 2021
Spread the love

निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : जीवनसाथी डॉट कॉम संकेतस्थळावर झाली ओळख

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

विवाह संस्थेच्या वेबसाईटवरुन ओळखीतून विश्वास संपादन करून एकाने लग्नाचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन तरुणीला तब्बल ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी प्रेमराज थेवराज (रा. चेन्नई, तामिळनाडू) याच्याविरुद्ध निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ एप्रिल २०२० ते ११ सप्टेंबर २०२१ दरम्यान चिंचवडमधील संभाजीनगर येथील फिर्यादी तरुणीच्या घरात घडला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी यांची जीवनसाथी डॉट कॉम या लग्नाच्या संकेतस्थळावर ओळख झाली. आरोपीने फिर्यादीसोबत लग्न करतो, असे सांगून २ ते ३ महिने फोनवर बोलून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आपल्याला पैशांची गरज असल्याचे खोटे सांगून फिर्यादीकडून एकूण ११ लाख ४ हजार ५०० रुपये घेतले.

फिर्यादीला लग्न करण्यासाठी चेन्नईला बोलावून घेतले. तेथे लग्नाचे फॉर्मवर सह्या घेतल्या. तसेच त्यानंतर त्याने फिर्यादीस लग्नाचे खोटे प्रमाणपत्र पाठविले. तू माझी पत्नी झालेली आहे. मला व्यवसायासाठी ८० लाख रुपये कर्ज तुझ्या नावावर काढून दे, असे सांगितले. तेव्हा फिर्यादीने त्याला कर्ज काढून देण्यास नकार दिला. त्यावर त्याने फिर्यादीचे आई वडिलांना बरेवाईट करण्याची धमकी दिली. फिर्यादीचा विश्वासघात करुन लग्नाचे आमिष दाखवून लग्नाचे खोटे प्रमाणपत्र पाठवून एकूण ११ लाखहजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();