आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यातील डुक्कर खिंडीत बिल्डरवर गोळीबार करणारा करमाळ्यातून अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 19, 2021
Spread the love

खंडणीविरोधी पथकाची कामगिरी : गेम केल्याशिवाय चप्पल न घालण्याची घेतली होती शपथ’!

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : साथीदाराच्या खूनाचा बदला घेतल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याची शपथ घेऊन बिल्डरवर गोळीबार करुन खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने करमाळा (जि. सोलापूर) येथून अटक केली आहे.

चेतन चंद्रकांत पवार (वय २७, रा. मेगा सिटी, एन एन डी टी कॉलेजजवळ, कर्वे रोड) असे या गुंडाचे नाव आहे.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे, विवेक जाधव यांना बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करुन पळून गेलेला चेतन पवार हा करमाळा येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी पांडे गावात सापळा लावून चेतन पवार याला पकडले. पुढील तपासासाठी त्याला वारजे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चेतन पवार याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न तसेच शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पाकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस अंमलदार नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितीन रावळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


बांधकाम व्यवसायिक रवींद्र सखाराम तागुंदे (वय ३६) यांच्यावर चौघांनी डुक्करखिंडीत जूनमध्ये गोळीबार केला होता. सुदैवाने त्यात तागुंदे बचावले. यातील संशयित आरोपी अभिजित येलवंडे (वय २४) याला अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार नकुल खाडे, चेतन पवार, उमेश चिकणे हे पळून गेले होते. तागुंदे व त्याच्या साथीदारांनी आरोपींचा मित्र दीपक सोनवणे याचा २०१३ मध्ये खून केला केला. या खून प्रकरणात रवींद्र तागुंदे हा जामीनवर सुटला आहे. दीपक याचा खून झाल्यानंतर नकुल खाडे याने या खूनाचा बदला घेतल्याशिवाय पायात चप्पल घालणार नसल्याची शपथ घेतली होती. तेव्हापासून आरोपी रवींद्रच्या मागावर होते.

जामिनावर सुटल्यानंतर रवींद्रचा गेम करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

get_footer();