आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यातील गुलटेकडीमध्ये गुंडांचा धुमाकूळ

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 25, 2021
Spread the love

सहा जणांवर गुन्हा : तलवार, कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

मोटारसायकल अंगावर घातली म्हणून जाब विचारल्याने गुंडाच्या टोळक्याने तरुणाच्या वाहनाची तोडफोड करून तलवार, कोयत्याने वार करून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. २३) गिरिधर भवन चौक, गुलटेकडी येथे पदपथावर पावणेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी राम राजू उमाप (वय २५, रा. अण्णा भाऊ साठे नगर, अरण्येश्वर, सहकारनगर) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अक्रम शेख, अन्वर ऊर्फ जम्ब्या शेख, शाहरुख शेख, ओंकार पवार, अमित शेकापूर, इमात शेख (सर्व रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राम उमाप रविवारी आपल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी चालले असताना अन्वर शेखने उमाप यांच्या अंगावर मोटारसायकल घातली. फिर्यादी यांनी त्याचा जाब विचारला असता, आरोपीने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोमवारी पहाटे तीन वाजता फिर्यादी यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालून त्यांच्या दुचाकीचा आरसा फोडून नुकसान केले.

या प्रकारावर न थांबता टोळक्याने फिर्यादी हे सोमवारी दुपारी दोन वाजता वडिलांच्या घरी जात असताना गिरिधर भवन चौकात अक्रम शेख याने विनाकारण लाथ मारली. त्याचा फिर्यादीने जाब विचारल्यावर सर्व टोळक्याने येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. शाहरुख शेख याने त्याच्याकडील तलवारीने फिर्यादीचे मित्र गोविंद याच्या पोटात घुसवून त्यांना जबर जखमी केले. अमित शेकापूर याने फिर्यादी यांना बांबूने मारहाण केली. आजूबाजूच्या लोकांनी मदतीला येऊ नये, म्हणून या टोळक्याने तलवारी, कोयते, पालघन व बांबू घेऊन परिसरात दहशत माजविली. स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले पुढील तपास करीत आहेत.

get_footer();