आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रमजान सण शांततामय वातावरणात व्हावा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 6, 2022
Spread the love

सागर पाटील : लष्कर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : रमजान सण शांततामय वातावरणा व्हावा, सण-उत्सवाच्या कालावधीमध्ये जातीय तेढ निर्माण होणार नाही, कायदा सुव्यवस्था सुरळीत राहील यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो वा पोस्टवर विश्वास ठेवू नये, अशा सूचना परिमंडल-2चे पोलीस आयुक्त सागर पाटील यांनी दिल्या.

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये मुस्लीम समाजाचे रमजान सणाच्या अनुषंगाने परिमंडळ-5 हद्दीतील पोलीस शांतता कमिटी सदस्य, मस्जिदचे ट्रस्टी व मौलाना यांची बैठक झाली.

मुस्लीम-हिंदू बांधवांच्या उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दलाला कायम सहकार्य करू, असे आश्वासन कोरेगाव पार्कमधील आक्रम मदारी, कात्रजचे सलीम शेख, लष्करमधील विकास भांबुरे यांनी दिले.

लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सूत्रसंचालन केले.

get_footer();