आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बलात्काराच्या गुन्ह्यातील 64 वर्षाच्या आरोपीला जामीन मंजूर

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 4, 2022
Spread the love

कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा : अतिरिक्त न्यायाधीशांचा निकाल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पतिपासून वेगळे राहणाऱ्या 42 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपातील एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी एम. देशपांडे यांनी जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती आरोपीचे वकील सिद्धांत मालेगांवकर यांनी दिली. याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून 64 वर्षाच्या आरोपीसह इतर दोघांनी बलात्कार केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

विजय शंकर पुरोहित (वय – 64) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर भरत जेठामल गांधी (वय 53, रा. एकबोटे कॉलनी) आणि दिलीप पुष्कराज ओसवाल (वय 53, रा. शुक्रवार पेठ) यांना यापूर्वी जामीन मिळाला आहे.

पीडित महिला ही तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिकसंबंध ठेवले. याची माहिती इतर दोन आरोपींना समजल्यावर त्यांनी देखील पीडित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने तिघांविरुद्ध फिर्याद दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली.

आरोपीने न्यायालयात जामिनासाठी वकील सिद्धांत मालेगांवकर यांच्यामार्फत अर्ज केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीच्यावेळी सरकारी वकिलांनी आरोपीच्या जामीनाला विरोध केला. आरोपीने इतर दोन आरोपींना घटनेचे व्हिडीओ आणि फोटो पाठवले असून हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आरोपीला जामीन मिळाल्यास ते पीडित महिलेवर दबाव टाकू शकतात तसेच आरोपी हा राजस्थान येथील बिकानेरचा असून तो पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामीन मंजूर करु नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

आरोपीचे वकिल सिद्धांत मालेगांवकर यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, आरोपी 64 वर्षांचे वयोवृद्ध गृहस्थ आहे. तसेच इतर दोन आरोपींना जामीन मिळालेला आहे. आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी केस नाही, आरोपीकडून कोणत्याही प्रकारची जप्ती करायची राहिलेली नाही. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व अटी व शर्तींचे पालन केली जाईल तसेच साक्षीदाराला अडथळा किंवा संपर्क करणार नाही. या गुन्ह्यात त्यांना खोट्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला.

get_footer();