आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 14, 2022
Spread the love

गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : ८०० क्विंटल तांदूळ जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसर परिसरामध्ये रेशनिंगच्या दुकानात वाटप केला जाणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या सहा जणांना अटक केली. आरोपीकडून ९७ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे गुन्हे शाखा युनिट-२च्या पोलिसांनी हडपसर १५ नंबरमध्ये ही कारवाई केली. तीन ट्रकसह ८०० क्विंटल तांदूळ जप्त केला आहे.

मोहंमद इरफान मेहमुदुल हसन अन्सारी (वय ३२, रा. मौलवीगंज, जि. धुळे), इरफान शेरु शेख (वय २८, रा. मज्जिद इसाक नंदी रोड, जि. धुळे), मोहंमद आसिफ अब्दुल लतीफ अन्सारी (वय ३०, रा. सौ फुटी रोड, जि. धुळे), शेख जावेद रहिम (वय ४४, रा. वल्लभनगर, धुळे), मोहंमद इब्राहिम अब्दुल जब्बार (रा. अकबर चौक, जि. धुळे), मुस्तकीम इस्माईल शहा (वय २३, रा. चांदतारा चौक, मरकत मस्जिद, जि. धुळे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट-२चे पथक स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी हडपसर-१५ नंबर येथे ट्रक क्रमांक एमएच 18 बी. ए. 7725, एमएच 18 बी.जी. 0053, एमएच 18 बी. जी 5859 या तीन ट्रकमध्ये रेशनिंगचा तांदूळ असून तो छुप्या पद्धतीने खुल्या बाजारात बेकायदेशिररीत्या घेऊन तो खोपोली (जि. रायगड) येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालक व क्लिनर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ट्रकमध्ये तांदूळ असल्याचे सांगितले. हा तांदूळ श्री कनकलक्ष्मी ॲग्रो ट्रेडर्स न्यु अेपीएमसी यार्ड सीबीएस गुंज गंगावटी (जि. कोपल, कर्नाटक) येथील गोडावूनमधून घेतला असल्याचे सांगितले. तसेच हा तांदूळ रेशनिंगचा असून, खोपोली (जि. रायगड) येथील जय आनंद फुड इंडस्ट्रीज येथे घेऊन जात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तीन ट्रक आणि ट्रकमधील 800 क्विंटल तांदूळ जप्त केला.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक यशवंत आंब्रे, पोलीस अंमलदार किशोर वग्गु, संजय जाधव, मोहसीन शेख, साधना ताम्हाणे, उत्तम तारु, चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने, निखील जाधव, समिर पटेल, कादीर शेख, मितेश चोरमोले, नवनाथ राख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();