आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रेडिमेड कपड्याचा व्यवसाय करणाऱ्यास लुबाडमारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 2, 2022
Spread the love

फरासखाना पोलिसांत फिर्याद : बुधवार पेठेतील क्रांती हॉटेलसमोर घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रेडिमेड कपडे विकून घरी जात असताना सहा हजार रुपये चोरून नेणाऱ्यास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवार पेठेतील सार्वजनिक रस्त्यावर क्रांती हॉटेलसमोर ३१ मार्च २०२२ रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास ही चोरीची घटना घडली.

अल्ताफ सुक्ते मन्सूर (वय ३४, रा. महंमदवाडी रोड, सय्यदनगर, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याच्या इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी माणिकचंद विश्वास (वय ४४, रा. बुधवार पेठ, पुणे) यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी बुधवार पेठेतील सार्वजनिक रस्त्यावर कपडे विकून पायी घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी रिक्षा आडवी घालून थांबविले आणि खिशातील सहा हजार रुपये जबरदस्तीने हिकावून घेऊन पळून गेले. फरासखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.

get_footer();