आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रियल इस्टेट व्यावसायिकावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 2, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : प्लॉटमध्ये लक्ष का घालतो यावरून झाला वाद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आणि प्लॉट डेव्हलप करणाऱ्या व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या 9 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे सातारा रोडवरील पुणे जंक्शन हॉटेलमध्ये बुधवारी (दि.30) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली.

सिद्धार्थ अनिल कांबळे (वय – 28 रा. चंद्रकांत रेसिडेन्सी, मानीजी नगर, नऱ्हे), हॉटेल मॅनेजर ज्ञानेश्वर एैवळे, हॉटेल पार्टनर शंकर मुजुमले हे जखमी झाले आहेत. याबाबत सिद्धार्थ कांबळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष उर्फ आप्पा कोळपे, बापू कोळपे, बंडू सुरेश कोळपे (सर्व रा. मु.पो. जांभळी भोर) यांच्यासह 5 ते 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ कांबळे यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. ते प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असून प्लॉट डेव्हलप करुन त्याची विक्री करतात. कांबळे यांनी जांभळी नसरापुर येथे प्रमोद जावळे यांचा 57 गुंठ्याचा प्लॉट घेतला आहे. याच कारणावरून आरोपींनी बुधवारी रात्री फिर्यादी यांच्या पुणे जंक्शन हॉटेलमध्ये येऊन जांभळी नसरापूर येथील प्लॉटमध्ये लक्ष का घालतो. अशी विचारणा करुन वाद घातला. तसेच या प्लॉटमध्ये लक्ष घालू नको अशी धमकी दिली.
आरोपींनी कांबळे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. यावेळी हॉटेल मॅनेजर आणि हॉटेलचे पार्टनर मध्ये आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. तसेच हॉटेल मधील सामानाची तोडफोड करुन नुकसान करुन पळून गेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर करीत आहेत.

get_footer();