आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 21, 2022
Spread the love

वानवडी पोलिसांची कारवाई : ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून गावठी पिस्टल व राऊंड असा ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीवर भांडण व दरोड्याचे गुन्हे दाखल असून, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

साहिल खंडू पेठे (वय २०, रा. तरवडेवस्ती, अल्कासा सोसायटीसमोर, साठेनगर, महंमदवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, धुलीवंदन सणाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गस्त सुरू होती. यावेळी वानवडी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील गुन्हेगार तरवडेवस्ती-महंमदवाडी येथे अग्निशस्त्र घेऊन थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून एक लोखंडी गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाकाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, सहायक पोलीस फौजदार संतोष तानवडे, पोलीस हवालदार संतोष मोहिते, अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख, सचिन गवळी, सिद्धेश्वर कसबे, अमित चव्हे, दीपक भोईर, महिला पोलीस अंमलदार राणी खांदवे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

get_footer();