आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना सायबर चोरट्याचा दणका

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 11, 2022
Spread the love

चतु:श्रृंगी पोलिसांत फिर्याद : ३ जुलै २०२१ रोजी झाली चोरी, आता गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बँका आणि पोलिसांकडून कोणालाही ओटीपी अथवा आपला गोपनीय क्रमांक सांगू नका असे वारंवार आवाहन केले जात असते. असे असताना एका सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना सायबर चोरट्यांनी केवायसी अपडेटच्या नावाखाली गंडा घातला आहे. हा प्रकार ३ जुलै २०२१ रोजी घडला होता. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बालेवाडी येथे राहणार्‍या ६३ वर्षांच्या सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सायबर चोरट्यांनी सहायक पोलीस आयुक्तांना मोबाईलवर फोन करुन तुमचे सीम कार्ड केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना लिंक पाठवून ती लिंक अपलोड करायला सांगितली. त्यानंतर आलेला ओटीपी त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर फिर्यादी यांच्या स्टेट बँक खात्यातून परस्पर ४९ हजार रुपये सायबर चोरट्याने काढून घेतले. पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

get_footer();