आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सेवानिवृत्ताला ऑनलाइन पद्धतीने २१ लाख ११ हजार रुपयांना फसविले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 20, 2021
Spread the love

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : १६ नोव्हेंबर रोजी रात्री अवघ्या २२ मिनिटांत लुबाडले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला २१ लाख ११ हजार रुपयांना ऑनलाइन पद्धतीने फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १६ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १.२८ ते १.५० वा. म्हणजे अवघ्या २२ मिनिटांमध्ये लुबाडल्याची घटना घडली आहे.

सेवानिवृत्त प्रदुम्न वासुदेव जोगळेकर (वय ६४, रा. श्वेता को-ऑपरेटिव्ह सोसायटी, राजाराम पुलाजवळ, सिंहगड रोड, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार ऑनलाईन ट्रान्जेक्शन करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून आरोपीने १२ लाख रुपये, सेव्हिंग खात्यावरील आठ लाख, एफ.डी. खात्यावरील ८० हजार रुपये असा एकूण २८३६०.७६ यू.एस. डॉलर म्हणजेच २१ लाख ११ हजार ६६० रुपयांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केली. पुढील तपास दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे करीत आहेत.

get_footer();