आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रिक्षाचालकाने तिघा साथीदारांसह तरुणाला लुबाडले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 7, 2022
Spread the love

फरासखाना पोलिसांत फिर्याद : मंगळवार पेठेत चाकूच्या धाकाने फोन पेद्वारे घेतले पैसे

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पार्सल आणण्यासाठी पहाटे रिक्षाने जात असताना रिक्षाचालकाने मंगळवार पेठेतील रेल्वे पुलाखाली नेऊन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने मोबाईल, फोन पेद्वारे पैसे घेऊन तरुणाला लुबाडले.

याप्रकरणी अनुप शिवहरी शिगोकर (वय १८, रा. ओम सुपर मार्केट, मॉडेल कॉलनी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप हे वडिलांनी पाठवलेले पार्सल आणण्यासाठी संगमवाडी येथे जात होते. त्याच्यासोबत त्याचा रुमपार्टनर रवींद्र मालखेडे याला घेऊन ६ मार्च रोजी पहाटे पावणेसहा वाजता ते जात होते. रिक्षाचालक व त्याच्याबरोबर दोघे जण बसले होते. त्यांनी रिक्षा संगमवाडी येथे न नेता मंगळवार पेठेतील रेल्वे पुलाखाली नेले. तेथे त्यांनी चाकूचा धाक दाखवून दोघांचे २ मोबाईल त्यांच्या खिशातील १ हजार रुपये तसेच फोन पे वरुन १ हजार ८०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याचा मित्र सार्थक याचे मोबाईलमधील फोन पे द्वारे २ हजार रुपये बळजबरीने ट्रान्सफर करुन घेतले. रिक्षामधील दोघांनी त्यांना दगडाचा धाक दाखवून तेथून निघून जाण्यास सांगून २६ हजार ७०० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरुन रिक्षातून पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक शेटे तपास करीत आहेत.

get_footer();