आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रिक्षाचालकाला मारहाण करणारे चौघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 30, 2021
Spread the love

दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : जनता वसाहतीमधील शंकर मंदिराजवळ घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रिक्षाचालकाला शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या चौघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केले. पर्वती-जनता वसाहतीमधील शंकर मंदिराजवळ ही घटना २६ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली.

वसीम शब्बीर शेख (वय १९), असिम शब्बीर शेख (वय १९), मौसिन शब्बीर शेख, वय २१), रहिम अन्वर पठाण (वय २७, सर्व रा. जनता वसाहत, पर्वती, पुणे) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी समाधान कारंडे (वय ३९, रा. लायगुडेवस्ती, पारे चौक, धायरी) यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पर्वतीमधील जनता वसाहत येथे शंकर मंदिर येथील सार्वजनिक रिक्षातून राशन घेऊन जात घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला रिक्षातून बाहेर ओढून शिवीगाळ करीत हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले. पुढील तपास दत्तवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर पुढील तपास करीत आहेत.

get_footer();