आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रिक्षाची काच फोडून कोयत्याच्या धाकाने धमकावणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 18, 2022
Spread the love

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : कळसगावातील आळंदी रोडवर पसरविली दहशत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रिक्षाची काच फोडून हातात कोयता घेऊन कोणाला जीवंत सोडणार नाही, असे धमकावणाऱ्या दोघांसह सात-आठ साथीदारांवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कळसगावातील आळंदी रोडवर १६ जानेवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

सोमनाथ भगत (वय ४२, रा. कळसगाव, आळंदी रोड, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार दोघांसह सात-आठजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीने राहत्या घरासमोर रिक्षा उभी केली होती. आरोपी व त्याच्या साथीदारांनी रिक्षाची काच फोडून हातामध्ये कोयता घेऊन कोणाला जीवंत सोडणार नाही, असे म्हणत कोयता दाखवून परिसरात दहशत पसरविली. त्या ठिकाणी असलेल्या दुचाकीवर लाकडी दांडक्याने मारून नुकसान केले. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप यादव पुढील तपास करीत आहेत.

get_footer();