आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रिक्षावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 26, 2021
Spread the love

तळजाई- कै. सदू स्टेडियमजवळ घडली घटना- रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

तळजाई टेकडीवरून बिकानेर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कै. सदू स्टेडियमजवळ रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अनिल मेगडे यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा कै. सदू स्टेडियमजवळीस भिंतीला धडकून अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षाचालक जखमी झाला असून, एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसरे दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बुनगे करीत आहेत.

get_footer();