आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रोख रकमेसह १४ लाख ५० हजार रुपयांच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 19, 2021
Spread the love

महमंदवाडी-तरवडेवस्तीमधील प्रकार : वानवडी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चोरट्याने पहिल्या मजल्यावर चोरपावलाने जात दिवाणमधील साडेचार लाख रुपये रोख आणि १४ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना तरवडेवस्ती-महमंदवाडीतील साठेनगर येथे १६ ऑक्टोबर २०२१ रोजी घडली.

रंगनाथ शिंदे (वय ५५, रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पहिल्या मजल्यावरील दरवाजा ओढून जेवणासाठी खालच्या रुममध्ये गेले. चोरट्याने संधी साधून चोरपावलाने जाऊन दिवानमध्ये डब्यात ठेवलेले साडेचार लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास वानवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव करीत आहेत.

get_footer();