आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रोख रकमेसह अडीच लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 5, 2022
Spread the love

खडकी पोलिसांत फिर्याद : औंधमधील लोकमंगल विहारमध्ये झाली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चोरट्याने कपाटातील रोख ३५ हजार आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ६२ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. औंधमधील लोकमंगल विहारमध्ये ही घटना सोमवारी (दि. २ मे २०२२) रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या सुमारास घडली.

औध (ट्रान्झिट कॅम्प)मधील ३३ वर्षीय महिलेने चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा देवाच्या पुजेचे साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी पैसे व दागिने कपाटात ठेवले होते. अज्ञात चोरट्याने कपाटातील ३५ हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस फौजदार दिनेश गडांकुश पुढील तपास करीत आहेत.

get_footer();