आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रोख रकमेसह पावणेदोन लाखांवर चोरट्यांचा डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 19, 2022
Spread the love

उत्तमनगर पोलिसांत फिर्याद : पोलादपूर-चांदणी चौक प्रवासादरम्यान झाली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलादपूर-चांदणी चौक दरम्यान एसटी व रिक्षाने प्रवास करताना चोरट्याने एक लाख ७१ हजार रुपयांवर डल्ला मारला. ही घटना १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीनच्या दरम्यान घडली.

विठ्ठल लक्ष्मण पार्टे (वय ७०, रा. स्वागत अपार्टमेंट, म्हाडा कॉलनी, कोकरी आगार, अँटोपहिल, पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पत्नीसह पोलादपूर-दापोडी एसटीने आणि त्यानंतर चांदणी चौक-वारजे माळवाडी दरम्यान रिक्षाने जात होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने पर्सची चेन उघडून १५ हजार ५०० रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. उत्तमनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. जायभाव पुढील तपास करीत आहेत.

get_footer();