आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सहकारनगरमध्ये भरदिवसा घरफोडी करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 15, 2021
Spread the love

गुन्हे शाखेची कारवाई : ६० हजार रोख आणि ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सहकारनगर, धनकवडी भागात भरदिवसा सदनिकांचे कुलुप तोडून ऐवज लांबविणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. चोरट्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून एक लाख ६० हजारांची रोकड, सोन्याचे दागिने, दुचाकी असा तीन लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रफिक हुसेन शेख (वय २६, रा. चिंतामणीनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, शेख याने आठवड्यापूर्वी धनकवडी, सहकारनगर भागात भरदिवसा घरफोडीचे गुन्हे केले होते. या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. सातारा रस्त्यावरील के. के. मार्केट परिसरात शेख थांबला असून, तो घरफोडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गजानन सोनुने यांना सूत्रांकडून मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यापूर्वी त्यांच्या विरोधात घरफोडीचे ३६ गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रकाश मोरे, वैशाली भोसले, यशवंत आंब्रे, उत्तम तारू, कादीर शेख, निखील जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();