आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चंदन तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 6, 2022
Spread the love

पाच लाख ५९ हजारांचा मुद्देमाल केला जप्त : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चंदन तस्करी करणाऱ्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चार लाख नऊ हजार ६०० रुपये किमतीचे १०२ किलो ४०० ग्रॅम वजनाच्या ओलसर चंदनाच्या झाडाचे तुकडे व एक लाख ५० हजार किमतीची कार असा एकूण पाच लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

लक्ष्मण भीमा गायकवाड (वय ४२, रा. तरडोबाचीवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, त्याच्यावर मंचर पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस स्टेशनमध्ये चंदन तस्करीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२चे अधिकारी-कर्मचारी लोणीकंद, वाघोली, विमाननगर परिसरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते, त्यावेळी चंदन तस्करी करून विक्री-खरेदी करण्यासाठी नगररोड परिसरात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार तातडीने घटनास्थळी धाव घेत पेरणे फाटा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्यास संशयावरून थांबण्याचा इशारा केला. मात्र, तो न थांबताच निघून गेल्याने त्याचा पाठलाग करून वाळके वस्ती (पेरणे, ता. हवेली) नगररोडवर पकडले. त्याच्याकडून चार लाख नऊ हजार ६०० रुपये किमतीचे १०२ किलो ४०० ग्रॅम वजनाच्या ओलसर चंदनाच्या झाडाचे तुकडे व एक लाख ५० हजार किमतीची कार असा एकूण पाच लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीवर मंचर पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस स्टेशनमध्ये चंदन तस्करीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, प्रवीण पडवळ, चेतन शिरोळकर, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();