आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत नवनाथ रणदिवेसह सातजणांना टोळीवर मोक्का

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 23, 2022
Spread the love

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : नव्या वर्षातील तिसरी तर आतापर्यंत ६७ वी कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोंढवा आणि बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साथीदारांसह स्वतःचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्यासाठी परिसरातील नागरिकांना दमदाटी करणे, घातक हत्यारांसह खून, संघटित व वैयक्तिकपणे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या किरण नवनाथ रणदिवे व त्याच्या साथीदारांवर गुन्हेगारी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यावर्षातील तिसरी तर आत्तापर्यंतची ६७ वी मोक्कांतर्गत कारवाई आहे.

किरण नवनाथ रणदिवे (वय २५, रा. शेळकेवस्ती, महालक्ष्मी सुपर मार्केटसमोर, अप्पर बिबवेवाडी, पुणे), अविनाश ऊर्फ ताऊ अर्जुन जोगन (वय २५), सूरज पांडुरंग खंडागळे (वय २८, दोघे रा. शेळकेवस्ती, अप्पर बिबवेवाडी, पुणे), वैभव सुभाष डबकरे (वय २५, रा. शेळकेवस्ती, बिबवेवाडी, पुणे), आकाश अशोक कोळी (वय २६, रा. शेळकेवस्ती, नवीन पाईपलाईन एजन्सीजवळ, बिबवेवाडी, पुणे), चंद्रकांत ऊर्फ चंदू गायकवाड (वय २७, रा. आगम मंदिराजवळ, कात्रज, पुणे), गणेश जोगदंड (वय १९, रा. शेळकेवस्ती, बिबवेवाडी) अशी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनसुद्धा सुधारणा होत नसल्यामुळे मोक्कांतर्गत कारवाई कऱण्यासाठी मंजुरी मिळविण्याकरिता कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. आरोपींवरील दाखल गुन्ह्याप्रमाणे मोक्कांतर्गत कारवाई कऱण्याची मंजुरी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी दिली असून, त्याप्रमाणे आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ राऊत, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस अंमलदार जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, जगदीश पाटील, रुपनवर यांच्या पथकाने आरोपीविरुद्धचे पुरावे जमा करून वरिष्ठ कार्यालयात सादर केले होते. कागदपत्रांची छाननी करून आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

get_footer();