आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत वाहनचोर जेरबंद, दोन लाखांची वाहने जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 28, 2022
Spread the love

खडक पोलिसांची कामगिरी : शुक्रवार पेठेतील साठे उद्यानाजवळ केली कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रिक्षा, दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत वाहनचोराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक रिक्षा आणि दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 5 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहे. ही कारवाई पुण्यातील शुक्रवार पेठेतील साठे उद्यानाजवळ करण्यात आली.

विनायक भारत कोळी (वय-26 रा. लोहियानगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने तपास पथकातील पोलिसांना वाहन चोरांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तपास पथकाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले जात असताना पोलीस अंमलदार रवी लोखंडे आणि संदिप तळेकर यांना सराईत गुन्हेगार विनायक कोळी याने शिवाजी महाराज रोडवरुन एक रिक्षा चोरली असून तो शुक्रवार पेठ येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवार पेठ येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने एक रिक्षा, एक केटीएम बाईक आणि एक अ‍ॅक्टिव्हा गाडी चोरल्याची कबुली दिली. आरोपीने केटीएम दुचाकी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीवर खडक, देहूरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, शंकर कुंभारे, पोलीस अंमलदार अजीज बेग, संदीप पाटील, संदीप तळेकर, रवी लोखंडे, विशाल जाधव, राहुल मोरे, हिंमत होळकर, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, सागर घाडगे, किरण शितोळे, महेंद्र पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();