आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत वाहनचोराला गुन्हे शाखेकडून अटक; दोन दुचाकी जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 20, 2022
Spread the love

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : फरासखाना आणि डेक्कन पोलिसांत गुन्हे दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात वाहन चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पुणे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाकडून हद्दीत पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील सराईत वाहन चोराला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील शनिवार पेठेतील ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज मठाजवळील रोडवर करण्यात आली.

मयुरेश अनंत डेरे (वय-33 रा. डेरेवाडा, 240 कसबा पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस पेट्रोलींग करत असताना, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मयुरेश डेरे हा चोरीची सुझुकी अ‍ॅक्सेस मोपेड घेऊन शनिवार पेठेत येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करुन फरासखाना आणि डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी मयुरेश डेरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरातील पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार शशीकांत दरेकर, राहुल मखरे, अशोक माने, अनिकेत बाबर, दत्ता सोनावणे, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();