आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईताला जेरबंद करून तीन दुचाक्या केल्या जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 1, 2021
Spread the love

सहकारनगरपोलीस स्टेशनमधील तपास पथकाची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सहकारनगर पोलीस स्टेशनमधील तपास पथकानेन धनवकडी स्मशानभूमीजवळ सराईत गुन्हेगाराला संशयावरून ताब्यात घेऊन तीन दुचाक्या जप्त केल्या. त्याने तळजाई बसस्टॉपजवळ ठेवलेल्या दोन दुचाक्या काढून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

शुभम विलास भगत (वय २०, रा. सावरकर चौकाजवळ, दत्तमंदिरासमोर धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी धनकवडी स्मशानभूमीजवळ एक व्यक्ती थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना सूत्रांकडून मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील ज्युपिटर जप्त केली. सहकारनगर पोली स्टेशनमध्ये आणून अधिक तपास केला असता, त्याने ॲक्टिवा आणि हिरोहोंडा स्प्लेंडर चोरल्याची माहिती देऊन तळजाई बसस्टॉप येथून काढून दिल्या. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.


अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक युनूस मुलाणी, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापू खुटवड, पोलीस नाईक भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, पोलीस शिपाई सागर सुतकर, महेश मंडलिक, महादेव नाळे, सागर शिंदे, शिवलाल शिंदे, प्रदीप बेडिस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();