आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईताला अटक करून विधिसंघर्षित बालकाला घेतले ताब्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 14, 2022
Spread the love

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : पाच लाखांचा मुद्देमाल केला जप्त

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

सोलापूर : सराईत मोटारसायकल चोरट्याला आणि विकत घेणाऱ्यांना अटक सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून 11 मोटारसायकली पाच लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

शंकू ऊर्फ शंकर सुरेश काळे (वय 30, रा. बोराळे, ता. मंगळवेढा, सध्या- तामदर्डी, ता. मंगळवेढा) असे अटक केलेल्याचे नाव असून, विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.

सोलापूर ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक टेंभुर्णी येथील करमाळा चौकात गस्त घालत होते. त्यावेळी जाधववाडी, सदाशिवनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील व्यक्ती चोरीच्या मोटारसायकल विक्री करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपीने मागिल दोन वर्षांपासून पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून मोटारसायकल चोरून विक्री करत असल्याचे सांगितले. आरोपीने सोलापूर-2, सातारा-6, पुणे-5 अशा 13 मोटारसायकली फायनान्स कंपनीच्या कर्ज परतफेड न करणाऱ्यांच्या मोटारसायकली असून, फायनान्स कंपनीकडून कागदपत्रे आल्यानंतर देतो, असे सांगून विक्री करीत असल्याचे सांगितले. आरोपीवर टेंभुर्णी, अकलूज, वालचंदनगर-2, बारामती, फलटण-2 असे गुन्हे दाखल आहेत.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षिका तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस अंमलदार परशुराम शिंदे, लालसिंग राठोड, नितीन चव्हाण, अजय वाघमारे, प्रमोद माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();