आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021
Spread the love

हडपसर-फुरसुंगीतील घटना : हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पती, सासू, सासरा व नणंद यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फुरसुंगी (ता. हवेली) येथे हा प्रकार ३१ ऑगस्ट २०२१ रोजी घडला.

आरतीकुमारी सुनीलकुमार यादव (वय २१, रा. सिद्धी ग्रीन सोसायटी, रेल्वेगेटजवळ, फुरसुंगी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी राकेशकुमार राय (वय ४५, रा. बिहार) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या पुतणीचा सुनीलुकमार यादव याच्याबरोबर विवाह झाला असून, सासू, सासरे, नणंद हुंड्यासाठी किरकोळ कारणावरून भांडण करीत. शिवीगाळ व मारहाण करून उपाशी ठेवत, मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने पुतणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक ढावरे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();