आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सावत्र मुलाचा खून करणाऱ्या बापाला तीन तासांत ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 25, 2021
Spread the love

बारामती शहर पोलिसांची कामगिरी : खून करून जवळच झाडीत लपला होता आरोपी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरगुती भांडणातून बापाने सावत्र मुलाचा कोयत्याने सपासप वार करुन खून केला. ही घटना पारवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथे घडली आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने वनविभागाच्या झाडीत लपलेल्या बापाला तीन तासांत बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.

गोपीनाथ मारुती जाधव असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मारुती साधुराम जाधव असे अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पारवाडी गावच्या हद्दीत शिपकुले वस्ती येथे कातकरी समाजातील एकने स्वत:च्या मुलाचा कोयत्याने डोक्यात वार करुन खून केल्याची माहिती पोलीस पाटलांनी दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ढवाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासामध्ये आरोपी मारुती साधुराम जाधव हा मजुरीसाठी पारवडी गावचे हद्दीत आला असून, त्यांचा सावत्र मुलगा गोपीनाथ मारुती जाधव याच्यासोबत घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्या रागातून आरोपीने मुलाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करुन खून करुन पळून गेल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी गुन्हेशोध पथक आरोपीच्या मागावर पाठवण्यात आले. आरोपी मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण होते. तसेच त्याचे कोणी नातेवाईक नसल्याने आरोपीचा फोटो मिळणे अवघड होते. पोलिसांनी घटनास्थळापासून वनविभागाचा 10 ते 15 किमीचा परिसरात पायी चालत आरोपीचा शोध घेतला. झाडीत लपलेल्या आरोपीला पोलिसांनी केवळ तीन तासात बेड्या ठोकल्या.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();