आवृत्ती पुणे
← Back to Homepage

SAVE HND आंदोलनाचा ऐतिहासिक विजय

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), Other, People, Social • December 1, 2025
Spread the love

पुणे : जैन समाजाच्या एच.एन.डी. जैन बोर्डिंग, पुणे परत समाजाला मिळवून देण्यासाठी छेडलेल्या SAVE HND आंदोलनाला मिळालेल्या ऐतिहासिक आणि भव्य यशानिमित्त पुण्यात अत्यंत मंगलमय वातावरणात “SAVE HND अभिनंदन सोहळा, पीछी परिवर्तन आणि धर्मोदय वर्षायोग कलश निष्ठापन समारोह” अभिनंदनाने संपन्न झाला.

या सोहळ्यात जैन समाजातर्फे आचार्य गुप्तिनंदिजी गुरुदेवांना “क्रांतिकारी राष्ट्रसंत” ही मानाची उपाधी प्रदान करण्यात आली. त्यांच्या धैर्य, दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांतून समाजाने एकजूट दाखवत जैन विद्यार्थ्यांची ऐतिहासिक धरोहर परत मिळविण्यात यश मिळवले.

पुण्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच डिजिटल माध्यमातील पत्रकारांनी आंदोलनाची भूमिका निर्भीडपणे मांडत समाजाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला. त्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह आणि अभिनंदनपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्यास शांतीलाल मुथा, विजयकांत कोठारी, ऍड. एस.के. जैन, शोभा धारीवाल, अचल जैन, विलास राठोड, लक्ष्मीकांत खाबिया, बाळासाहेब धोका, सीए अशोककुमार पगारिया, डॉ. कल्याण गंगवाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रम उजळला.

आंदोलनाचा प्रारंभ ते विजयाचा टप्प्यापर्यंत प्रत्येक क्षणी अग्रेसर राहणाऱ्या अक्षय जैन, सीए आनंद कांकरिया, ऍड. योगेश पांडे, स्वप्निल बाफना, स्वप्नील गंगवाल, अण्णा पाटील, चंद्रकांत पाटील, सुकौशल जिंतूरकर, महावीर चौगुले यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी मनीष जैन, महावीर शहा, वीरेंद्र शाह, सुजाता शहा, मिलिंद फडे, देवेंद्र बाकलीवाल, स्वप्निल पाटणी, शीतल लोहाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. अरविंद जैन, एस.पी. जैन आणि संजोग शहा हे प्रमुख प्रायोजक म्हणून पुढे आले. वरिष्ठांचे मार्गदर्शन, युवा व महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे अधिष्ठान मिळाले.

समारोप शांतिपाठाने झाला. जैन समाजाने विद्यार्थीहित, समाजहित आणि धर्मसंवर्धन यासाठी अशीच एकजूट कायम ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

get_footer();