आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सव्वासहा लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 28, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : व्हीआयटी होस्टेल चौकात चोरट्यांनी साधला डाव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : फ्लॅटचे कुलूप उचकटून ३० हजार रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण सव्वासहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढव्यातील व्हीआयटी होस्टेल चौक येथे शनिवारी (दि. २६ मार्च २०२२) सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान चोरीची घटना घडली.

अरविंद जैन (वय ३८, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कोंढव्यातील व्हीआयटी होस्टेल चौक येथील फिर्यादीचा फ्लॅट कुलूपबंद होता. अज्ञात चोरट्याने कुलूप उचकटून ३० हजार रुपये रोख आणि दागिने असा एकूण सहा लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले पुढील तपास करीत आहेत.

get_footer();