आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सुरक्षारक्षकासह दोघांना दगडाने गंभीर मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 25, 2021
Spread the love

पुणे विद्यापीठातील आयुकाच्या गेटवरील घटना : गेट उघडले नसल्याचे निमित्त

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुका गेट का उघडले नाही, म्हणून सुरक्षारक्षकासह दोघांना अज्ञात इसमांनी दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर रिक्षातील टॉमी हातात घेऊन अंगावर धावून आले आणि शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. याप्रकरणी अज्ञातांवर चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.


याप्रकरणी लक्ष्मण देवळकर (वय ३३, रा. धोबी घाट, क्वार्नर, पुणे) यांनी चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादी पुणे विद्यापीठ येथे सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते पुणे विद्यापीठाच्या मुख्य बिल्डिंगमध्ये ड्यूटी ऑफिसर सुरक्षारक्षक भूषण पाटील आणि परशुराम फोलाणे यांच्याबरोबर कर्तव्यावर होते. त्यावेळी आयुका गेट का उघडले नाही, या कारणावरून आरोपींनी दगडाने तोंडावर, डोक्यावर मारून जखमी केले. तसेच रिक्षातील टॉमी हातात घेऊन मारण्याकरिता फिर्यादीच्या अंगावर धावून आला आणि शिवीगाळ व धक्काबुक्की केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कपिल भालेराव पुढील तपास करीत आहेत.

get_footer();