आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शहरात चोरट्यांचा उच्छाद सुरूच, पोलिसांसमोर आव्हान

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 20, 2021
Spread the love

अवघ्या पाऊण तासात चोरी : ‘मॉर्निग वॉक’ला गेल्यानंतर चोरट्यांनी फोडले ‘घर’!

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घराबाहेर पडताना दागिने घालून गेले तर मोटारसायकलवरुन येऊन गळ्यातील दागिने कधी खेचून नेतील, याचा काही नेम राहिला नाही. दागिने घरात ठेवले आणि काही वेळाबाहेर बाहेर गेले तर चोरटे घरफोडी करुन कधी घर धुवून नेतील, याचा काही नेम राहिलेला दिसून येत नाही. चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हानच उभे केले आहे. हडपसर-गोसावीवस्तीमधील महिला मॉर्निंग वॉकला गेल्या आणि अवघ्या ४० मिनिटांत घरी परतल्या. तोपर्यंत चोरट्यांनी १५ हजार ५०० रुपये सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, गोसावी वस्तीमधील महिला मॉर्निंग वॉकसाठी शुक्रवारी सकाळी ६ वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडल्या. सुमारे ४० मिनिटांनी त्यात परत घरी आल्या. तोपर्यंतच्या काळात चोरट्याने घराचे कुलूप तोडून १४ हजार ५०० रुपयांचे ८ ग्रॅम ९८० मिलीग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. शुक्रवारी दिवसभरात शहरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटनांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवणे येथील महिला कुटुंबासह मुळशी येथे गेल्या असताना चोरट्यांनी फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून ४८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले.

ऊरुळी देवाची येथील बंगल्याच्या किचनची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व १ लाख ४३ हजार ५०० रुपयांचे ४६ ग्रॅम वजनांचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली.

get_footer();