आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शहरात रिक्षा चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 18, 2022
Spread the love

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : आरोपीवर १४ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरामध्ये रिक्षा चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरीची रिक्षा जप्त करुन रिक्षा चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.

अशोक उर्फ संतोष चंद्रकांत ढेरे (वय-46 रा. आळंदी गाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर यापूर्वी 14 गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कोर्ट परिसरातून एक रिक्षा (एमएच 12 क्युआर 9158) चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट-३च्या पोलिसांना हा गुन्हा अशोक ढेरे याने केल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी आरोपीला येरवडा कारागृहातून बाहेर येताच ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर केले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीची रिक्षा जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला. आरोपीवर यापूर्वी 14 गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग रमाकांत माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसारगर, पोलीस अंमलदार भिवरे, कांतिलाल गुंड, बशीर सय्यद, रुपेश वाघमारे, रणजित फडतरे, शरद राऊत यांच्या पथकाने केली.

get_footer();