आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शाळा सुटताच ‘मॉनिटर’ला बांबू अन् बेल्टने बेदम मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 30, 2022
Spread the love

कोंढवा परिसरातील घटना : कटिंग का केली नाही या रागातून घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शाळेतील मॉनिटरने सर्वांसमोर प्रश्न विचारल्याच्या रागातून विद्यार्थ्याने वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘मॉनिटर’ला बेदम मारहाण करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा (पुणे) परिसरातील एका शाळेत २७ मार्च २०२२ रोजी मारहाणीची घटना घडली.

ओवेज कैफ (वय १८) याच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, कोंढवा परिसरातील एका शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात मुले शिकत आहेत. तर पीडित मुलगा वर्गाचा मॉनिटर आहे. २७ मार्च रोजी मॉनिटरने वर्गातील दोन विद्यार्थ्यांना सर्वांसमोर तुम्ही कटिंग करुन का आले नाहीत? अशी विचारणा केली. याचा राग मनात धरुन आरोपी मुलांनी मॉनिटरला शिवीगाळ करत दमदाटी केली. ते एवढ्यावरच थांबले नाही. आरोपींनी शाळा सुटल्यानंतर पीडीत मॉनिटरला इतर मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केली. आरोपींनी कंबरेच्या बेल्ट आणि लाकडी बांबूने मारहाण केली. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मारहाणीचा हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर, पीडित मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. कोंढवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

get_footer();