आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शाळेत असताना मारल्याचा वर्गमित्राने तब्बल 16 वर्षांनी घेतला बदला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 28, 2021
Spread the love

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : औंधमधील एम्स हॉस्पिटलमध्ये घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शाळेत एकाच वर्गात शिकत असताना साततत्याने मारहाण करणाऱ्या मित्राचा एकाने तब्बल 16 वर्षाने वचपा काढला. संबंधित मित्राला रस्त्यात गाठत बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर घरात घुसूनही मारण्यात आले. औंधमधील एम्स हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली.

याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून, अमोल अंकुश कांबळे (वय ३३, रा. पुणे) यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, २४ ऑक्‍टोबर रोजी रात्री दहा वाजण्याचे सुमारास अमोल कांबळे हे घरी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या विकी शिरतरने त्यांना थांबवून, मला ओळखले का अशी विचारणा केली. त्यावेळी अमोल याने सांगितले आपण दोगे एका वर्गात होतो. त्यानंतर विकी म्हणाला, शाळेत असताना तू मला खूप मारत होता. आता सापडला तुला सोडणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करुन लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर कांबळे घरात गेले असता विकी व त्याच्या मित्राने घरात शिरुन त्यांना लाकडी बॅटने डोळयास, पाठीवर व हातावर मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();