आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शंभर कोटींचा गंडा घालणाऱ्याच्या नाशिकमधून मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 9, 2021
Spread the love

चंदननगर पोलिसांत गुन्हा : कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लि.कडून 100 जणांना फसविले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून 100 जणांकडून पैसे घेऊन फसवणूक करणार्‍या कुबेर शक्ती मल्टी पर्पजच्या संचालकाला चंदननगर पोलिसांनी नाशिकहून अटक केली आहे. त्याच्याबरोबर शादाब गुलाम शेख (रा. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिरीष ऊर्फ ओम ज्ञानदेव खरात (वय ३८, रा. नाशिक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जितेंद्र चंद्रभान शुक्ला (वय २८, रा. कात्रज, आंबेगाव) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिरीष खरात याने खराडी येथील प्राईड आयकॉन व उत्तम प्लाझामध्ये कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लि. या नावाने कार्यालये थाटली. 90 ते 100 लोकांना कर्ज काढून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. कोणत्याही प्रकारचे कर्ज काढून न देता लोकांची 6 लाख 41 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक थोपटे तपास करीत आहेत.

get_footer();