आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शेअर मार्केटमधून सुरुवातीला दिला नफा, नंतर लाखांना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 11, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : ऑनलाइन संपर्कातून संपर्क साधत केली फसवणूक

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला फायदा करुन देण्याच्या आमिषाने सुरवातीला फायदा करुन दिला. मात्र, त्यानंतर लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्यावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 22 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाइन घडला आहे.

विनीत चौधरी (रा. कोलकाता) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बराजु सुरेश गोडसे (रा. टिळक नगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे शनिवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने फिर्यादी यांना ऑनलाईन संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी आरोपीवर विश्वास ठेवून काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली. आरोपीने सुरुवातील फिर्यादी यांना चांगला नफा मिळवून देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांचे झिरोदा ट्रेडिंग अकाउंटचे युजर आयडी व पासवर्ड घेतले. त्यावेळी त्याने परवानगी शिवाय अकाउंट वापरणार नसल्याचे आश्वासन दिले. मात्र आरोपी विनीत चौधरी याने फिर्यादी यांचे ट्रेडिंग अकाउंट वापरून 1 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();