आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शूज खाली पडल्याच्या कारणावरुन मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 25, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील शिवशंभोनगरमध्ये घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बाल्कनीमधून शूज खाली पडल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करणाऱ्या महिलेसह तिघांवर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.२२) रात्री कात्रजमधील शिवशंभोनगर शारदा शांतिनिकेतन बिल्डिंगमध्ये घडला.

धर्मेंद्रकुमार पांडे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ज्योती धमेंद्रकुमार पांडे (वय ३०) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहीत मिश्रा, ब्रिजेश तिवारी, संगीता तिवारी (सर्व रा. शारदा शांतिनिकेतन बिल्डींग, गल्ली नं. ४, शिवशंभोनगर, कात्रज) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. मंगळवारी संध्याकाळी फिर्यादी यांच्या घराच्या बाल्कनीमधून शूज खाली पडला. या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांचे पती धमेंद्रकुमार यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर रोहित मिश्रा याने लाकडी बांबू धमेंद्रकुमार पांडे यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच आरोपींनी पांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();