आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन लैलावर बलात्कार करणारा मजनू जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 30, 2021
Spread the love

वडगावशेरीतील घटना : मोबाईलवर व्हीडिओ शूट करत धमकी देत केला बलात्कार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात आणि बीडमध्ये अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. आता पुण्यातील वडगाव शेरी येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी मुलीच्या प्रियकराला देखील अटक करण्यात आली.

अमित अबदेश यादव (वय- 18) आणि धनंजय नामदेव रोकडे (वय- 38) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी पुण्यातील वडगाव शेरी येथे राहतात. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमित आणि धनंजयला अटक केलं.

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना, एका तरुणानं त्यांचा अश्लील व्हिडीओ मोबाइलमध्ये शूट केला होता. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने पीडित तरुणीला धमकावलं. तसेच जबरदस्तीने शरीर संबध ठेवण्यास पीडितेला भाग पाडलं. दरम्यान हे सगळ सुरू असताना प्रियकरही यात सामिल झाल्याचं समोर आलं आहे. आरोपी तरुण प्रेयसीवर बलात्कार करत असताना, प्रियकर तरुणाने बलात्काराचा व्हिडीओ बनवला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ त्याने आपल्या मित्रांच्या मोबाईलवर पाठवून मुलीची बदनामी केली. त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

अमित याचे 2019 पासून पीडित मुलीशी प्रेमसंबंध होते. दरम्यान आरोपी अमितने 4 ऑगस्ट रोजी आरोपी अमितने पीडित मुलीला वडगावशेरी येथील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत नेलं होतं. तिथं दोघांनी शरीरसंबंध ठेवले. त्याचवेळी इमारतीत असलेली धनंजय रोकडेने दोघांचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केला. धनंजय रोकडे बलात्कार करत असताना तरुणीच्या प्रियकराने त्याचा व्हिडीओ बनवला. तेवढ्यावरच न थांबता त्याने तो व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवला. त्यामुळे पीडितेची बदनामी झाली.

get_footer();