आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सिंहगड रोड परिसरात तरुणाला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 31, 2022
Spread the love

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : गणपती विसर्जनाच्या वादातून झाला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गणपती विसर्जनादिवशी झालेल्या वादातून एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण करणाऱ्या चौघांवर दत्तवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड रोड येथील चैतन्य हॉस्पिटल समोर सोमवारी (दि. 28) रात्री दहाच्या सुमारास हा हा प्रकार घडला.

राहुल प्रकाश थोरात (वय २३, रा. दांडेकर पुल, सिंहगड रोड, पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.29) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भावड्या सकट, सनी पवार, वैभ्या, पऱ्या कांबळे (सर्व रा. एस. आर. ए. स्कीम, म्हाडा कॉलनी, रामटेकडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, राहुल थोरात आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सोमवारी रात्री फिर्यादी हे घराबाहेर बसले असताना आरोपी त्या ठिकाणी आले. आरोपींनी गणपती विसर्जन दिवशी झालेल्या वादाचा राग मनात धरुन राहुलला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी यांचे वडिल आले असता आरोपींनी त्यांच्याही हातावर लाकडी दांडक्याने मारुन जखमी केले. जखमी राहुल थोरात याने मंगळवारी दत्तवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.

get_footer();