आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोन्याचे बिस्कीट देण्याच्या आमिषाने महिलेला फसविले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 20, 2021
Spread the love

हडपसरमधील घटना : ३० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र नेले चोरून

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसरमध्ये चहाच्या दुकानासमोर तीन अनोळखी व्यक्तीने महिलेला सोन्याचे बिस्कट देतो, असे सांगून ३० हजार रुपये किमतीचे सोन्याने मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १७ सप्टेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास हडपसरमधील येवले चहाच्या दुकानासमोर घडली.

सुरेखा अण्णाप्पा तावशे (वय ५१, रा. भकेराईनगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी फिर्यादीला सोन्याचे बिस्कट देण्याचे आमिष दाखवून सोन्याचे मंगळसूत्र फसवून नेले. ही घटना हडपसरमधील येवले चहाच्या दुकानासमोर शुक्रवारी (दि. १७ सप्टेंबर) घडली. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.

get_footer();